‘एनएससीआय’ ने केलं ‘भाग मिल्खा भाग’ला पदक देऊन सन्मानित

अभिनेता फरहान अख्तर आणि दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा चित्रपट ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच या चित्रपटाने १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केल्याने त्यांना या चित्रपटाचे यश साजरा करण्याची अजून एक संधी मिळाली आहे. एवढेच नाही तर या चित्रपटाच्या यशाबद्दल नॅशनल स्पोर्ट ऑफ इंडिया (एनएससीआय)ने केक कापूनही या चित्रपटाच्या यश साजरा केले आहे. सूत्रांकड़ून मिळालेल्या माहितीनुसार नॅशनल स्पोर्ट ऑफ इंडिया (एनएससीआय) ने या दोघांना या चित्रपटाच्या यशाबद्दल पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. एनएससीआय कडून मिळालेले हे पदक आणि प्रमाणपत्र म्हणजे भाग मिल्खा भागच्या टीमला मिळालेली एक मोठी पावतीच आहे.

Leave a Comment