पृथ्वीवर अवतरलेले पहिले मानव अॅडम आणि इव्ह यांच्या काळाचा शोध घेण्यात संशोधकांना यश आले असून प्रथम अॅडम आणि कांही काळानंतर इव्ह पृथ्वीवर आल्याचे जे मानले जाते त्यात तथ्य असल्याचे या संशोधकांचे म्हणणे आहे. अॅडमचा काळ साधारण १ लाख २० हजार ते १ लाख ५६ हजार वर्षांपूर्वीचा तर इव्हचा काळ ९९ हजार ते १ लाख ४८ हजार वर्षांपूर्वीचा असावा असे त्यांचे म्हणणे आहे.
स्टॅनफर्ड विद्यापीठ, युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन मेडीकल स्कूल आणि स्टोनी ब्रुक युनिर्व्हर्सिटी यातील संशोधकांनी एकत्रित पणे हे संशेाधन केले असून त्याचा मुख्य बेस डीएनए साखळीतील केवळ पुरूषांतच आढळणार्या वाय क्रोमोसोम साखळीची मांडणी करणे हा होता. त्यासाठी जगाच्या पाठीवरील विविध भागातील ६९ पुरूषांचे डीएनए गोळा केले गेले होते. त्यात सब सहारण आफ्रिकेपासून सायबेरिया, कंबोडिया, पाकिस्तानल अलेरिया, मेक्सिको येथील पुरूषांचा समावेश केला गेला होता.
या विषयी सांगताना संशोधक जेफ्री कीड म्हणाले की प्रथमच पुरूषांतील वाय क्रोमोसोम साखळीवर संशोधन होत आहे. पहिली स्त्री पृथ्वीवर कधी अवतरली याचा शोध स्त्रीमधील डीएनएवरूनच लावला गेला आहे. मात्र पुरूष कधी अवतरला यासाठी केल्या गेलेल्या संशोधनात प्रथमच पेशीच्या आत असलेल्या डीएनएमधील केवळ पुरूषांमध्येच आढळणार्या वाय क्रोमोसोमची साखळी उलगडली गेली आहे. हा क्रोमोसोम वडिलांकडून मुलाकडे कोणतेही बदल न होता येत असतो. यापूर्वी या संशेाधनासाठी कांही तांत्रिक मर्यादा येत होत्या. आता त्यात दूर झाल्या असल्याने हे संशोधन शक्य झाले आहे. त्यातून पृथ्वीवरील विविध मानवी समुहात असलेले संबंध आणि त्याच्या स्थलांतराचा पॅयर्न मांडणे शक्य होणार आहे.