समाज कार्यासाठी रोहिणी नीलेकणी यांची १६५ कोटींची मदत

नवी दिल्ली दि.३ – सामाजिक कार्यकर्त्या, अर्घ्यायम चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा, प्रथम बुक्सच्या अध्यक्षा आणि इन्फोसिसचे सह संस्थापक व युनिक आयडेंटिफिकेशन अॅफ इंडियाचे अध्यक्ष नंदन यांच्या पत्नी रोहिणी नीलकेणी यांनी आपल्या मालकीच्या इन्फोसिस शेअरपैकी कांही शेअर विकून उभे केलेले १६५.५ कोटी रूपये विविध सामाजिक कार्यासाठी दिले आहेत.

रोहिणी यांच्याकडे इन्फोसिसच्या शेअरपैकी १.४१ टकके हिस्सा होता त्यापैकी कांही त्यांनी विकला आहे. आता त्यांच्याकडे १.३१ टक्के हिस्सा शिल्लक असून त्याची बाजारातली आजची किमत २२५५ कोटी रूपये आहे. रोहिणी यांनी जुलै १६ ते १९ या दरम्यान ५ लाख ७७ हजार शेअर्स विकले आहेत.

रोहिणी नीलेकणी म्हणाल्या की गेली कांही वर्षे त्या शिक्षण, पर्यावरण, पाणी, प्रशासन व अन्य सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक जाणीवेतूनच शेअर विक्रीतून आलेला पैसा खर्च केला जाणार आहे. अर्घ्यायम चॅरिटेबल ट्रस्टसाठी त्यांनी १५० कोटी रूपये दिले आहेत. पाणी व सॅनिटेशन कामांसाठी या पैशांचा विनियोग केला जाणार आहे. त्या प्रथम बुक्स कंपनीच्या अध्यक्षा असून या कंपनीतर्फे लहान मुलांसाठी पुस्तके प्रकाशित केली जातात.

Leave a Comment