लघुकथांचा प्रिमियर

स्टार प्रवाहने ‘स्टार प्रवाह प्रिमीयर’ या नवीन संकल्पनेची घोषणा केली. या अंतर्गत, चॅनलवरून प्रत्येक महिन्याला एक लघु कथा प्रसारित करेल. यांतील प्रत्येक लघुकथा दोन तास कालावधीची असेल. या विषयी बोलताना श्रावणी देवधर म्हणाल्या, लघुकथा आमच्याकरिता एक नवीन फॉरमॅट आहे. मालिकांच्या फॉरमॅट मध्ये सहजासहजी न बसणारे विषय घेउन आम्ही काम करत आहोत. प्रत्येक कथेत आम्ही नाती-संबंधांतील एका नव्या बाबींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिली लघुकथा ‘दंगा 2 बीएचके’ दोन वेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमींमधून आलेल्या जोडप्याची कथा आहे. या मध्ये उदय टिकेकर, सुचित्रा बांदेकर, उदय सबनीसआणि प्रिया बेर्डे अशा नामवंत कलाकारांनी सिद्धार्थ चांदेकर आणि प्रार्थना बेहरे यांच्या भूमिका आहेत.

Leave a Comment