दीपिकाने केली कतरिनावर मात

– कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोन या बॉलीवूडमधील सध्याच्या आघाडीच्या नट्यांचे संबंध नेहमीच ताणलेले राहिले आहेत आणि यामागचे कारण आहे रणबीर कपूर. कारण या दोघींचेही रणबीर कपूरसोबत नाव जोडले जात आहे. आता त्यांच्यातील या संबंधांमध्ये आणखी वितुष्ट येण्याची शक्यता आहे.
फराह खानच्या एका आगामी चित्रपटात निवड होण्यासाठी कतरिना जोरदार प्रय▪करीत होती. मात्र हाच चित्रपट दीपिकाने तिच्या हातून हिसकावून घेत त्यात स्वत:ची वर्णी लावली आहे. शाहरूख खान नायक असलेल्या ‘हॅप्पी न्यू इयर’ नावाच्या या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी सुरुवातीस कतरिनाचे नाव अग्रस्थानी होते, पण आता मात्र ती या चित्रपटात काम करण्याची शक्यता फारच
कमी असल्याचे समजते.

अलीकडेच तिने दोन नवीन चित्रपट स्वीकारल्याने तिचे नाव मागे पडूू शकते. यातील एक चित्रपट साजिद नाडियादवालाचा आहे, तर दुसरा अभिषेक कपूरचा. त्यामुळे कतरिनाकडे सध्या शाहरूखच्या चित्रपटात काम करण्यासाठीही वेळ नाही. खरेतर फराह खानचे दिग्दर्शन असलेल्या या
चित्रपटात काम करण्यासाठी ती अतिशय उत्सुक होती, पण तारखांच्या गोंधळामुळे तिला ते शक्य नाही. कतरिना व फराह दोघींचे चांगलेच जमते. ‘तीस मार खां’ या चित्रपटात तिने फराहच्या आग्रहाखातर एक आयटम सॉँगही केले होते. सगळ्य़ात महत्त्वाचे म्हणजे शाहरूखसोबत तिला पुन्हा जोडी जमविण्याची संधी चालून आली होती. ही एक मोठी संधी होती व तिला ती हातची जाऊ द्यायची नव्हती. मात्र तिच्या या स्थितीचा दीपिकाने अचूक फायदा उचलला. दीपिकाचीही शाहरूखसोबत चांगलीच गट्टी आहे.

‘ओम शांती ओम’नंतर ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी सगळेच वाट पाहत आहेत. कतरिनाप्रमाणे दीपिकाही फराह खानची फेव्हरिट असल्याने कोणतीच समस्या येणार नाही.

Leave a Comment