राज्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या चालू आर्थिक वर्षात १ १ ० नव्या शाखा

पुणे , दि. २ : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक ऑफ महाराष्ट्र चालू आर्थिक वर्षात १ १ ० नव्या शाखा राज्यात सुरु करणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र सिंह यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बँकेला ९ ० टक्के अधिक निव्वळ नफा झाला असून हा आकडा १ ४ ० .४ ६ कोटी रुपयांवरून २ ६ ६ . ३ ३ कोटी रुपये झाला आहे अशी माहिती देऊन ते म्हणाले की एकूण ठेवी ३ २ टक्के वाढून १०५४४६ . ६ ५ कोटी रुपयांवर गेल्या आहेत. बँकेच्या एकूण व्यवसायात ३ ६ टक्के वाढ अहोउन तो १८८४५७ . ० कोटी रुपये झाला आहे.

बँकेच्या आगामी योजनांबाबत श्री सिंह म्हणाले की ज्येष्ठ नागरिकांसाठी रिव्हर्स मोर्गेज आधारित महाआसरा ही नवी योजना पुढील महिन्यापासून सुरु केली जाणार आहे. तसेच उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी एका आठवड्यात एका वेळी दोन कोटी रुपये रोख भरणा आणि ५ ० ला ख रुपये रक्कम काढण्याची सुविधा घरपोच दिली जाणार आहे . त्यासाठी प्रती दोन लाख रुपयासाठी १२५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सदनिका खरेदी करताना भरावे लागणारे मुद्रांक शुल्क देत यावे यासाठी आधी निबंधक कार्यालया नजीक शाखात आणि नंतर सर्व शाखा त सुविधा सुरु केली जाणार आहे.

बँकेची भांडवली गरज भागावी यासाठी २२०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. ती रक्कम सप्टेंबर महिन्यात मिळेल असा अंदाज आहे असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment