सट्टा खेळणा-या तीन बुकींना गोव्यात अटक

पणजी – बुधवारी श्रीलंक-दक्षिणअफ्रिका दरम्याकन सुरू असलेल्या सामन्यावर ऑनलाईन सट्टेबाजी सुरु होती. याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानी याप्रकरणी त्वारीत कारवाई करीत सट्टा खेळणा-या तीन बुकींना गोव्यातील मीरामार बीचवरुन अटक केली. दुसरीकडे श्रीलंकेने काल दक्षिण अफ्रिकेवर १२८ धावांनी विजय मिळवत मालिका ४-१ ने जिंकली.

सुनील शुक्ला, हितेश देसाई आणि हितेश जटाकिया अशी अटक करण्यात आलेल्या तीन बुकींची नावे आहेत. हे सर्वजण मुंबई येथे राहणारे असल्याचे समजते. गोव्यात ते खास सट्टा खेळण्यासाठी आले असल्याचे समजते. पोलिसांनी श्रीलंका-दक्षिणअफ्रिका सामन्यावर हे तीघेजण ऑनलाईन सटटा घेत असल्या चे लक्षात आल्यांकनतर या तिघांना अटक करण्यात आली. या ऑनलाईन सट्टेबाजीवर पोलिसांनी मुंबई येथील हेडक्वायर्टरमधून लक्ष ठेवले होते.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्याय या तीन बुकीचा संबध मोठया रॅकेटशी असल्याचे समजते. त्या मुळे त्यांची कसून चौकशी सुरु आहे, असे पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी सांगितले. घटनास्थळावरुन सहा मोबाइल फोन, लॅपटॉप आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.