विनयभंग करणा-या नायब तहसीलदारास झोडपले

बीड – महिलेच्यार घरात घुसून विनयभंग करण्याचा प्रयत्न करणा-या शिरूर तालुक्यातील नायब तहसीलदारास ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून झोडपले. शिरूर तालुक्यातील वंजारवाडी येथील महिलेच्या तक्रारीवरून पाटोदा पोलिसात शिरूरचे नायब तहसीलदार नानासाहेब पोलाने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

संजय गांधी निराधार योजनेतंर्गत अपंगाची फाइल मंजूर करून देतो म्हणत हे नायब तहसीलदार रात्री महिलेचा पती खराच अपंग आहे का याची खात्री करायची आहे म्हणून घरी आले होते. रात्री नऊच्या सुमारास सोबत दारूची बाटली घेवून आलेल्या नायब तहसीलदार पोलाने याने अपंगाच्या पत्नीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्यांनी अश्लील चाळे केले. महिलेने आरडाओरड करताच नायब तहसीलदार पोलाने यांच्यावर लक्ष ठेवून असलेल्या संतप्त ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून त्यांना झोडपले.

या संदर्भात महिलेने दिलेल्या तक्रारी वरून नायब तहसीलदार पोलाने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार पोलाने यास अटक केली. दोन दिवसात नायब तहसीलदार पोलाने यांचे निलंबन केले जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

Leave a Comment