दीपिकाने करायला लावले शाहरुखला वेट

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादूकोन दिवसेंदिवस हिट होत चालली आहे. त्याचप्रमाणे ती आता केयरलेस सुध्‍दा होत चालली आहे. शाहरुख खान सोबत सिनेकरियर सुरू करणारी दीपिका गेल्या काही दिवसांपासून शाहरूखलाच वेट करायला लावत आहे.

शाहरुख आणि दीपिकाला आगामी काळात येत असलेल्या ‘चेन्नैइ एक्सप्रेस’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी एक टीवी शोच्या सेटवर शूट करायचे होते. याठिकाणी शाहरुख तर वेळेवर आला होता मात्र दीपिका खपू वेळ झाला तरी याठिकाणी पोहचली नाही. दीपिकाची वाट पाहत-पाहत चार तास निघून गेले मात्र दिपीका त्या ठिकाणी पोहचली नाही. शाहरुख खान त्याचठिकाणी १५ मिनिट आधीच पोहचला होता. चार तासानंतर दीपिका त्या ठिकाणी पोहचली आणि तिने लेट येण्याचे कारणपण सांगीतले नाही.

सगळेजण दीपिकाचा हा मूड पाहून आवक झाले. रात्री ९ वाजल्यानंतर सर्वांना शूट बंद करून लंडनला जायचे होते. त्यामुळे त्यांनी ही शुट घाई गडबडीतच उरकली.त्यामुळे शुटमध्ये बरीच कमतरता राहून गेली होती. त्यामुळे लंडनहून आल्यानंतर परत दीपिकासोबत शाहरुखला पुन्हा एकदा शूट करावे लागले.

Leave a Comment