सलमान करणार इलियाना सोबत रोमान्स

बॉलीवुडचा दबंग स्टार सलमान खान आता आगामी काळात दिग़दर्शक सूरज बड़जात्या यांच्या् सिनेमातून झळकणार आहे. त्यामुळे या सिनेमात सलमान बर्फी गर्ल इलियाना डिक्रूज सोबत सिल्वर स्कीनबवर रोमान्स करताना दिसणार आहे. सूरज बड़जात्या राजश्री प्रोडक्शनच्या बैनरसाठी आठ वर्षानंतर सिनेमा करीत आहेत.

सूरजने यापूर्वी २००६ साली ‘विवाह’ सिनेमाचे दिग़दर्शन केले होते. त्यासाठी सुरजने सलमान खानची निवड केली आहे. सूरज सलमान खानच्य अपोजिट या सिनेमात अभिनेत्रीचा शोध ब-याच दिवसापासून घेतला जात होता. मात्र त्यांचा शोध आता संपला असून या सिनेमासाठी आता त्यांनी अभिनेत्री म्हजणून बर्फी गर्ल इलियाना डिक्रूज हिची निवड केली आहे.

बर्फी गर्ल इलियाना डिक्रूज हिच्या निवडी पूर्वी सुरजने या सिनेमात सोनाक्षी सिन्हा, अनुष्का शर्मा, परिणीति चोप्रा आणि कैटरीना कैफ सोबत चर्चा केली होती. मात्र या सिनेमातील कामासाठी बर्फी गर्ल इलियाना डिक्रूज सूट होत असल्याने तिची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात या सिनेमातून सलमान आणि इलियाना डिक्रूज पहिल्यांदाच सिल्वर स्कीनवर रोमान्स करताना दिसणार आहेत.

Leave a Comment