आता प्रियंका-करीनाची दोस्ती

काही दिवसापूर्वीच अभिनेता शाहरूख खान आणि सलमान खान यांच्यामतील गेल्या ब-याच दिवसांपासून सुरू असलेला वाद मिटला. त्यानंतर आता प्रियंका चोप्रा आणि करीना कपूर या दोघी हात मिळवण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे आगमी काळात आता प्रियंका चोप्रा आणि करीना कपूर यांच्यातील संबधपुर्वी सारखे होणार असे दिसते.

सध्या करीना आणि प्रियंका शूटिंगच्या कारणाने आसपास आहेत. करीना एक कमर्शल शूटिंगच्या निमित्ता‍ने बिजी आहे. प्रियंका या ठिकाणी तिच्या सिनेमाची शूटिंग करीत आहे. प्रियंका मेरी कॉमच्या जीवनावरील आधारित बायॉग्राफी करीत आहे. त्यातचवेळी करीना काम संपवून कार जवळ आली असता तिला प्रियंका वैनिटी वैन मधून बाहेर पडताना दिसली. त्यामुळे दोघीनी एकमेकीची भेट घेतली.

यावेळी दोघीनीपण एकमेकीची तारीफ केली. यावेळी प्रियंका व करीनाने बराच वेळ एकमेकासोबत घालवीला. काही दिवसांपूर्वी दोघीतले संबध खूपच ताणले गेले होते. मात्र काही दिवसांपूर्वी करीनाने प्रियंकाच्या. वडिलाच्या निधनानंतर शोकसभेला हजेरी लावली होती. यावेळी तिच्या सोबत करिश्मा देखील होती. त्यामुळे आता दोघीनीपण झाले गेले विसरून आता मैत्री सुरू केली आहे.

Leave a Comment