पीटरसन, पानीसरची तिस-या कसोटीसाठी निवड

लंडन – अशेस मालिकेतील तिस-या कसोटीसाठी इंग्लंडने १४ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये पोटरीच्या दुखापतीने त्रस्त असलेला सिनियर क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनला कायम ठेवण्यात आले आहे. त्यासोबतच डावखुरा फिरकीपटू मॉँटी पानीसरचे निवड करण्यात आली आहे. मार्चनंतर त्याने एकही कसोटी खेळलेला नाही. त्यामुळे आता आगामी मालिका जिंकण्यासाठी इंग्लंड संघ सज्ज झाला आहे.
तिस-या कसोटीसाठी इंग्लंड संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. त्यामध्ये स्टीवन फिन आणि ग्रॅहम ओनियन्स या वेगवान गोलंदाजांना वगळून जेम्स टेलर आणि वेगवान गोलंदाज ख्रिस ट्रेम्लेटला संघात स्थान मिळाले आहे. पोटरीच्या दुखापतीने त्रस्त असलेला पीटरसन अचानक सामन्यात खेळला नाही तर अंतिम संघात टेलरला संधी मिळेल.

अशेस मालिकेतील तिसरी कसोटी मॅँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डवर एक ऑगस्टपासून खेळली जाणार आहे. पहिल्या दोन्ही कसोटी जिंकत यजमान इंग्लंडने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यापमुळे हा सामना जिंकून मालिका जिंकण्यास इंग्लंड संघ उत्सू्क आहे संघ पुढीलप्रमाणे: अलिस्टर कुक (कर्णधार), ज्यो रूट, जोनाथन ट्रॉट, केव्हिन पीटरसन, इयन बेल, जॉनी बेअस्टरे, मॅट प्रायर (यष्टिरक्षक), टिम ब्रेस्नन, स्टुअर्ट ब्रॉड, ग्रॅमी स्वान, जेम्स अडरसन, जेम्स टेलर, ख्रिस ट्रेम्लेट, मॉँटी पानीसर.

Leave a Comment