उत्तराखंडमध्येव पुन्हा एकदा ढगफुटी

डेहरादून – उत्तराखंड राज्याला पुन्हा एकदा ढगफुटी झाली आहे. यामध्ये कसलीच जिवीतहानी झाली नसल्याचे राष्ट्रीय आपत्ती निवारण कक्षाच्या अधिका-याने सांगितले. चमोली जिल्ह्यातील सुनाली गावात बुधवारी पहाटेपासून जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी दगड कोसळण्याच्या तसेच घरे पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

तेफना आणि तिरफाक गावात मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याशिवाय ऋषीकेश-बद्रीनाथ आणि ऋषीकेश-केदारनाथ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे. काही दिवसापूर्वीच झालेल्या- ढगफुटीमुळे सहा हजारपेक्षा अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले होते.

सतत पडणा-या पावसामुळे गंगा, यमुना, काली, गोरी, आणि शारदा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदी किनारी राहणा-या नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. यामध्ये कसलीच जिवीतहानी झाली नसल्याचे राष्ट्रीय आपत्ती निवारण कक्षाच्या अधिका-याने सांगितले.