चीनची भारतात दहा लाख कोटीची गुंतवणूक व सीमेवर सेनेची जमवाजमवही

चीन आंध्र‘प्रदेशात दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा आंध्र‘प्रदेशचे मुख्यमंत्री एन कुमार रेड्डी यानी नुकतीच केली आहे. देशातील महत्वाच्या राज्यातील जबाबदार मुख्यमत्र्यांनी ही घोषणा केली असल्याने त्याची गांभिर्याने दखल घेणे आवश्यक आहे. कारण एका बाजूला चीन सध्या भारताच्या उत्तर सीमेवर कुरापत काढण्याच्या पवित्र्यात आहे. त्या देशाची भारताच्या संदर्भात पार्श्वभूमीच विश्वासघात व आक्रमण करण्याची आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या देशावर जे मोठे आघात झाले त्यात चीनच्या आक‘मणाचा समावेश असल्याने ‘दुधाने तोंड भाजल्यावर ताकही फुंकून प्यावे’ असे जे म्हटले जाते त्यात बदल करून दुधाने तोंड भाजल्यावर ताक तर फुंकून प्यावेच पण ते जर चीनसारख्या विश्वासघाताने आक्र‘मण करण्याची पार्श्वभूमी जर असेल तर चीनने पुढे केलेला हिमालयातील बर्फही फुंकून वापरला पाहिजे, अशी खूणगाठ बांधण्याची गरज आहे. आंध‘प्रदेशचे मुख्यमंत्री एन कुमार रेड्डी यानी हैदराबादेत जी पत्रकारपरिषदेत माहिती दिली ती त्यानुसार त्यांच्याशी होणार्‍या प्रस्तावित करारात चीन आंधमध्ये दहा हजार विद्यार्थी त्यांचे पुढील शिक्षण घेण्यासाठी पाठविण्याची शक्यता आहे. चीन जर भारतात गुंतवणूक करणार असेल तर त्याकडे अजून तीन दृष्टीकोनातून बघण्याची गरज आहे.

एक म्हणजे भारतात भूमिगत व आक्रमक स्वरुपात काम करणार्‍या माओवादी किंवा नक्षलवादी नावाच्या ज्या चळवळी आहेत त्या चीनच्या पाठिंब्यावर सुरु आहेत. भारतात छत्तीस गड, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यात त्याचे स्वरुप ऊग‘ स्वरुप धारण करणार्‍या आहेत. प्रामुख्याने तेलंगणात अशी भूमिगत चळवळ अनेक दशके आहे. आता तेथे तेलगंणा चळवळीतूनच स्वतंत्र राज्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरे म्हणजे गेली पंधरा वर्षे चीनने भारतात जीवनोपयोगी वस्तू अतिशय कमी किंमतीत पाठविण्याचा सपाटा लावला आहे. ज्याची किंमत भारतीय बाजारपेठेत तीनशे रुपये आहे ती वस्तू चीनमधून आयात होणार्‍या ठिकाणी अवघ्या साठ रुपयात किंवा शंभर रुपयांत मिळते. देशभर हजारो मॉल्स व काही लाख दुकाने या चिनी वस्तूंच्या साठ्यांनी भरभरून वाहात आहेत.तेथे विक्रीही तुफान होत आहे. प्रामुख्याने संगणकाला लागणार्‍या सॉफ्टवेअर हे अलिकडे चीनमधून येत आहे व ते अतिशय कमी किंमतीत येत आहे. मुलांना लागणारी खेळणी की ज्यात ती स्वयंचलित असण्याची आकर्षण दाखवण्यासाठी त्यात संगणकीय यंत्रणा बसविलेली असते, ती अनेक ठिकाणी स्फोटक असल्याची शंका येत आहे. तिसरे असे की, गेल्या काही दिवसात ब्रेकिंग इंडिया’ पुस्तकात डॉ राजीव मलहोत्रा यानी पुराव्यानिशी म्हटल्याप्रमाणे भारतात सध्या एका बाजूला जेहादी संघटना, दुसर्‍या बाजूला ख्रिश्चन मिशनरीज तिसर्‍या बाजूला माओवादी यांनी संघटितरित्या भारतात या देशाच्या एकात्मतेला खिंडार पाडण्यासाठी परस्परांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.

चीनने प्रामुख्याने अन्न प्रकि‘या उद्योग, लघु उद्योग, शिक्षण, पायाभूत सुविधा या क्षेत्रातील उद्योगात गुंतवणूक करण्यास प्राधान्य दर्शविले आहे. मु‘ख्यमंत्री कुमार शेट्टी यांनी गुंतवणुकीसाठी उद्योजकांकडून प्रस्ताव मागविले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातील कोणत्या क्षेत्रात चीन गुंतवणूक करू इच्छितो याची चाचपणी केली जात आहे. दरम्यान शुसन मा यांनी चीनमधून 10 हजार विद्यार्थी आंध्रात विविध शैक्षणिक क्षेत्रात शिकण्यासाठी पाठविले जातील असेही सांगण्यात आले आहे. चीनने इतक्या प्रचंड रक्कमेची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली असली तरी नक्की किती काळात ही गुंतवणूक केली जाणार आहे हे स्पष्ट केलेले नाही.तरीही भारतातील विकासकामासाठी विदेशातील गुंतवणुकीचे स्वागत व्हायला हवे या मर्यादित दृष्टीकोनाच्या पलिकडे जावून यावर विचार व्हायला हवा. कारण एकशेसाठ अब्ज डॉलर्स म्हणजे (सध्याचा डॉलरचा भाव साठ ते पासष्ठ रुपये) ही गुंतवणूक पावणेदहाते दहा लक्ष कोटीची झाली. एका बाजूला हिंदी चिनी भाई भाई अशा घोषणा करून भारतावर आक्रमण करणे व त्याचवेळी त्या मैत्रीच्या वातावरणाचा फायदा घेवून येथील अगदी पुण्याच्याही दारुगोळा निर्मितीकारखान्याची पाहणी करणे असे कौशल्य त्यावेळचे चीनचे प्रधानमंत्री चौएनलाय यांनी दाखविले होते.

गेले वर्षभर चीन हिमालयाच्या बर्फाच्छीत सीमेवर आक्र‘मक भूमिका घेत आहे. प्रथम जेंव्हा चीनने लडाखमध्ये दहा मैलपर्यंत घुसखोरी केली तेंव्हा दुसर्‍या कोणत्या टोकाला पंधरा मैल घुसखोरी करून उत्तर द्यायला हवे होते. पण प्रत्युत्तराचा जो प्रयत्न झाला तो फारच किरकोळ झाला. गेले वर्षभर हा प्रयोग सुरु आहेच.

चीनचे चीनमध्ये जे शत्रू आहेत ते चीनच्या बाहेर मित्र आहेत येवढेच नव्हे तर चीन त्या शत्रूंच्या संघटनेला मोठ्या प्रमाणावर अर्थिक मदत करत आहे. चीन हा पाकिस्तानचा गेल्या पन्नास वर्षातील भरंशाचा मित्र आहे. पण चीनमध्ये मुसलमानांच्या बाबत अतिशय कडक भूमिका आहे. गेल्या महिन्यात काही प्रांतात झालेल्या दंगलीत मुसलमानंाच्यावर रणगाडे चालवण्यात आले. त्याच कारवाईचा परिणाम म्यानमारमधील बौद्ध समाजात तणावाचे वातावरण झाले व त्यात मोठ्या प्रमाणावर मुस्लिमांचे बळी होण्यात झाला. तरीही पाकिस्तान त्याबाबत कायम मूग गिळूनच बसला आहे. जी स्थिती जेहाद्यांबाबत तीच स्थिती ख्रिश्चनांच्याबाबत आहे. जगात अनेक ठिकाणी चीन व ख्रि‘श्चन यांच्यात दाट मैत्रीचे संबंध आहेत.पण चीनमध्ये रोमन कॅथलिक समाजाकडे कायमच संशयाने बघितले जाते. हे लोक आज ना उद्या चीनचा ख्रिस्तनिस्तान करतील, असा संशय ते उघडपणे बोलून दाखवतात व त्यांना तोंड देण्यासाठी त्यांनी चीनचे स्वतंत्र चर्च उभे केले आहे. भारतात जेहादी आणि मिशनरी यांच्याशी समन्वय करण्यात जरी चीन आघाडीवर असले तरी चीनमध्ये ख्रिश्चनांना ‘प्रत्येक क्षणाला अस्तित्वासाठी लढा’यासाठी लढावे लागते.

चीनसारख्या नाजूक विषयावर भारताला सध्या तरी काही बाजूच नाही, अशी स्थिती आहे. भारतावर काश्मिरमधून आक्र‘मक भूमिका घेणार्‍या दहशतवाद्याबाबत जर भारत सरकार राजकीय आघाडीवर बोटचेपी भूमिका घेते तर त्याच सरकारमधील मंडळी आपल्या राजकीय फायद्यासाठी दूरदर्शी मुत्सद्देगिरीची भूमिका घेतील असे सांगता येत नाही. तरीही राजकारण हे राजकारण्यानीच करायचे असते. त्यामुळे या संवेदनशील विषयावर देशव्यापी चर्चा घडवून आणणे आवश्यक आहे. या विषयावर केंद्र सरकार काय भूमिका घेते, महाराष्ट्राचे मुख्ययमंत्री पृथ्वीराज चव्हाण काय भूमिका घेतात, गुजराथचे मुख्‘यमंत्री नरेंद्र मोदी यांची काय भूमिका असेल, निरनिराळ्या राजकीय संघटना, विद्यापीठातील विद्यार्थीसंघटना यांना काय म्हणायचे आहे हे देशाला कळले पाहिजे.
गेल्या दहा बारा वर्षात आपल्या देशातील अठ्ठावीस राज्यातील प्रत्येक मु‘ख्यमंत्री त्यांच्या राज्यात विदेशी गुंतवणूक आणण्यात धन्यता मानतो आहे. या सार्‍या प्रकारात आंध्रने अधिक कडी केली आहे. अशी विदेशी गुंतवणूक आणण्यात धन्यता मानणे हे एका बाजूला व विदेशी गुंतवणूक दिसली की नाक मुरडणे हे दुसर्‍या बाजूला अशी दोन टोकांची प्रतिकि‘या होत असते. या नव्या प्रस्तावावर देशाने खुलून चर्चा करणे आवश्यक आहे. देशातील राजकारणात प्रत्यक्ष काम करणार्‍या राजकारण्यापेक्षा तरुण पिढी अधिक कृतीशील आहे. पण सरकारने निर्णय करण्यापूर्वी त्यांना बोलते करणे आवश्यक आहे.