‘देवयानी’ मधून अनुज सक्सेनाचे मराठीत पदार्पण

नामवंत टेलिव्हीजन अभिनेता अनुज सक्सेना 25 जुलैपासून स्टार प्रवाहच्या आघाडीच्या शोजपैकी एक असलेल्या देवयानीमधून मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे. या मालिकेत तो ‘अनुज दफ्तरदार’ नामक देवयानीचा बॉस असलेल्या वकीलाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
विखे-पाटिल घराण्यात स्वीकृती आणि प्रतिष्ठा मिळवण्याकरिता संघर्ष करत असलेल्या देवयानीने संग्रामच्या पाठिंब्याने आपले शिक्षण पूर्ण करण्यात यश मिळवले आहे. वकील म्हणून आपली व्यावसायिक कारकिर्द सुरु करण्याकरिता ती अनुज दफ्तरदारच्या फर्ममध्ये सामील झाली आहे. नोकरी करण्याच्या तिच्या निर्णयाने संग्राम आणि तिच्या सासरकडच्यांवर कसा परिणाम होतो? ते तिचा निर्णय मान्य करतात की त्यामुळे देवयानीपुढे अजून समस्या उभ्या ठाकतात? जाणून घेण्याकरिता पाहा ‘देवयानी’ दर सोमवार ते शनिवार.

Leave a Comment