भोपाल – कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांच्या विरुद्ध शहापुरा पोलीस ठाण्यात वादग्रस्त ट्विट प्रसारित केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मध्य प्रदेशाचे ज्येष्ठ मंत्री भाजपा नेते राघवजी यांच्यावर अनैतिक लैंगिक व्यवहाराच्या संबंधात गुन्हा दाखल झाला आणि त्यांंना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर दिग्विजयसिंग यांनी प्रतिक्रिया म्हणून प्रसारित केलेल्या ट्विटमध्ये धार्मिक भावना दुखावणारा मजकूर असल्याचा आरोप असून त्यावरून त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक संगीत वर्मा यांनी दाखल केलेल्या ङ्गिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. परंतु दिग्विजयसिंग यांनी हा आरोप नाकारला असून आपल्या ट्विटचा राघवजी यांच्या बडतर्ङ्गीशी कसलाही संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. राघवजी यांंंना बडतर्ङ्ग केल्यानंतर बर्याच दिवसांनी आपण ही प्रतिक्रिया व्यक्त केली होती, असे दिग्विजयसिंग यांचे म्हणणे आहे.
दरम्यान कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल होण्याच्या निषेधार्थ आंदोलन केले आणि शहापुरा पोलीस ठाण्याला घेराव केला. कॉंग्रेसचे माजी आमदार पी.सी. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हा घेराव झाला. मध्य प्रदेशाचे भाजपाचे सरकार दरोडे, खून, बलात्कार, मारामारी अशा गुन्ह्यांची नोंद कित्येक दिवस करत नाही परंतु दिग्विजयसिंग यांच्या विरुद्ध तातडीने गुन्हा दाखल झाला. हा पक्षपात असल्याचा त्यांचा आरोप होता. पोलिसांनी लाठीमार करून हा घेराव उठवला.