व्हिसा मुक्त जागतिक पर्यटन स्थळे

नवी दिल्ली – परदेशात पर्यटनाला जायचे असेल तर पासपोर्ट, व्हिसा यांच्या कटकटीतून जावे लागते. ज्या देशात प्रवास करायचा असेल त्या देशाच्या भारतातल्या वकिलातीत जाऊन व्हिसा मिळवावा लागतो. तो नेहमी मिळतोच असेही नाही. देशाला पर्यटनाची गरज मात्र असते. पण व्हिसा मिळविण्यात अडचणी आल्या तर पर्यटकांचा हिरमोड होतो आणि त्याचा पर्यटन व्यवसायावर नकळतपणे परिणाम होतो. म्हणून जगातल्या काही देशांनी पर्यटकांसाठी व्हिसाची कटकटच ठेवली नाही. अशा देशामध्ये पर्यटक व्हिसाशिवाय मनमोकळेपणे ङ्गिरू शकतात.

Moshier-Island

जगातल्या सहा देशांनी व्हिसाची अट काढून टाकली आहे. त्यामध्ये प्रमुख देश आहे ङ्गिजी बेटे. ३३२ बेटांचा हा देश आहे. त्यातल्या ११० बेटांवर लोकांची कायमची वस्ती झालेली आहे. त्या व्यतिरिक्त ५०० छोटी बेटे आहेत.

Bhutan

भूतान हा असा दुसरा देश आहे, जिथे केवळ पासपोर्टच्या आधारावर मनसोक्त भटकता येते. चीन आणि भारताच्या सीमेवरील हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या छोट्या देशाला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे.

ngiji-Island

हिंद महासागरातील सेशल्स हा देश सुद्धा व्हिसामुक्त आहे. ११५ बेटांचा समूह असलेला हा देश नितांत सुंदर आहे. तसा दुसरा देश मॅसेडोनिया. यूरोपच्या आग्नेय भागातील हा डोंगराळ देश पर्यटकांचे भान हरपून जावे असे निसर्गाचे लेणे ल्यालेला आहे.

Seychelles

मॉशिरस बेटावर सुद्धा व्हिसाची गरज नाही. या देशाला पृथ्वीवरला स्वर्ग म्हटले जाते. तिथे पर्यटकांसाठी आलिशान सोयी उपलब्ध आहेत. तिथले लोक सुद्धा आतिथ्यशील आहेत. हॉंगकॉंग हा सध्या चीनच्या ताब्यात असला तरी तिथेही व्हिसाशिवाय प्रवेश करता येतो. तसेच मानवाने निर्माण केलेले सौंदर्य न्याहाळू शकतो.

Leave a Comment