पूनम पांडेचे पोस्टर जाळले

मुंबई- पूनम पांडेचे बोल्ड छायाचित्रे असलेल्या ‘नशा’ सिनेमाचे पोस्टर्स मुंबई मधील स्थानिकांनी जाळले. त्या नंतर पूनमच्या या अश्लिल पोस्टर्सची संतप्त झालेल्या दिल्लीतील नागरिकांनी होळी केली आहे. त्यामुळे मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे हिचा ‘नशा’ हा सिनेमा वादाच्या भोव-यात सापडला आहे. तिचा हा वादग्रस्त सिनेमा २६ जुलै रोजी रिलीज होणार आहे.

या ना त्या कारणाने नेहमी वादाच्या भोव-यात असणारी मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा वादात आडकली आहे. आगामी काळात रिलीज होणा-या ‘नशा’ या सिनेमाचे बोल्ड पोस्टर्स पाहून संतप्त झालेल्या मुंबईतील नागरिकांनी पोस्टर्स फाडून जाळून टाकले. तसेच, दिल्लीतील सीमापूरी भागातील नागरिकांनीही चित्रपटाचे पोस्टर्स जाळले आणि काही पोस्टर्स पोलीस ठाण्यात नेऊन त्याबाबत तक्रार दाखल केली.

पूनम पांडे ‘नशा’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. याबाबत बोलताना पूनम म्हणाली, ‘या सिनेमाचे पोस्टर्स पाहून काही जणांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागण्यास तयार आहे. सिनेमातील काही दृश्य सोडता प्रेक्षकांना आवडेल असे खूप काही आहे. प्रेक्षकांना मला अशा भूमिकेत आणि कपडयांमध्ये पहायला आवडत असल्याने त्यामुळे तसा लूक केला आहे.’

Leave a Comment