ई.टिव्ही मराठीवर मिसेस अन्नपूर्णा

सासू आणि सुनामध्ये पहिल्यापासून असलेल्या युद्धाच्या संकल्पनेवर ईटीव्ही मराठी घेऊन येत आहे तुमच्यासाठी ज्यामध्ये सासु आणि सुनेमध्ये चढाओढ जुंपणार आहे ती म्हणजे मिसेस अन्नपूर्णा कोण ठरेल हा किताब मिळविण्यासाठी? प्रतिभावान शेफ पराग कान्हेरे घराघरातील अन्न पूर्णब्रम्ह बनविणार्‍या अन्नपूर्णांचा शोध घेणार आहे. या क्षेत्रातील नैपुण्य आणि पदार्थांमध्ये नवनवीन शोध घडविण्याची कला सासु आणि सुन या दोघीनाही एक स्वादिष्ट व रुचकर पदार्थ बनविण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील. जिचा पदार्थ लज्जतदार असेल ती ठरेल मिसेस अन्नपूर्णा. या कार्यक्रमाची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शन्सने केली असून 22 जुलै पासून सोमवार ते शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजता हा कार्यक्रम प्रसारीत केला जाणार आहे.

Leave a Comment