नवी दिल्ली- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबाबतच्या वक्तव्यावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घूमजाव केला. जातीयतेवरून आपण मोदीं यांना क्लीन चिट दिलेली नाही. मी केलेल्यात वक्तव्याचा प्रसार माध्यामांनी विपर्यासत केला असून मी त्यांच्या बाबतीत तशा स्वरूपाचे वक्तव्य केले नसल्यायचे स्पाष्ट केले आहे.
अण्णांनी इंदूरमध्ये नरेंद्र मोदी हे जातीयवादी असल्याचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत, असे वक्तव्य केले होते. शिवाय आपला कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही. काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष भरकटलेले असल्याचे अण्णा यांनी प्रसारमध्यामांशी बोलताना सांगितले होते.
या वक्तव्या वरून त्यानंतर रणकंदन माजले होते.
त्यामुळे अण्णांनी यापूर्वी केलेल्याच आपल्याच विधानावरुन घूमजाव केला आहे. गुजरातचे मुख्य मंत्री मोदी हे जातीयवादी नाहीत? असे मी बोललोच नाही. अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. अण्णा म्हणाले, ‘मोदी जातीयवादी नेते आहेत. म्हणूनच त्यांनी कधीही गोध्रा हत्याकांडाचा निषेध केलेला नाही.’