पी.सथशिवम भारताचे मुख्य न्यायाधीश

नवी दिल्ली दि.१९- भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून पी. सथशिवम यांना आज म्हणजे शुक्रवारी सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी याच्या हस्ते शपथ देण्यात आली. ६४ वर्षीय सथशिवम हे भारताचे ४० वे मुख्य न्यायाधीश बनले आहेत. मुख्य न्यायाधीशपदी विराजमान होण्याचा बहुमान सथशिवम यांच्यामुळे प्रथमच तमीळनाडू राज्याला मिळाला आहे.

सथशिवम या पदावर २६ एप्रिल २०१४ पर्यंत कार्यरत राहणार आहेत. त्यांच्या पूर्वीचे मुख्य न्यायाधीश अल्तमस कबीर हे गुरूवारी या पदावरून निवृत्त झाल्यानंतर सथशिवम यांनी हे पद ग्रहण केले आहे. त्यांच्या शपथविधीला पंतप्रधान मनमोहन सिग यांच्यासह अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते.