पजेरोची अॅनिव्हर्सरी एडिशन सादर

नवी दिल्ली दि.१९ – मित्सुबिशी पजेरो स्पोर्टस गाडीला भारतीय बाजारात सादर केल्याला वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या जपानी कार उत्पादक कंपनीने नव्या स्वरूपातील पजेरो स्पोर्ट अॅनिव्हर्सरी एडिशन बाजारात आणली आहे.

याविषयी माहिती देताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व सीइओ उत्तम बोस म्हणाले की अॅनिव्हर्सरी एडिशनमध्ये कांही अधिक फिचर्स ग्राहकांना देण्यात आले आहेत. त्यात टचस्क्रीन मल्टीमिडिया इन्फोटेनमेंट सिस्टीम, जीपीएस नेव्हीगेटर, रिअर व्हयू कॅमेरा, रियर स्पॉयलर या बरोबर जीडब्ल्यूडी सिस्टीमचाही समावेश आहे. या सिस्टीममुळे चालक इंधन बचत करू शकणार आहे. नवी पजेरो चेन्नईजवळील थिरूवल्लूर येथील प्रकल्पात असेंबल करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment