उद्धव ठाकरे घेणार आज भाजप नेत्यांची भेट

नवी दिल्ली: शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौ-यावर आहेत. या दरम्यान ते शुक्रवारी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे समजते. उद्धव ठाकरे हे सुरुवातीला लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी ते जातील. त्यानंतर उद्धव ठाकरे भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांची भेट घेणार असल्याचे समजते.

सूत्रांच्या माहितीनुसार खासदार संजय राऊत यांच्या घरी उद्धव ठाकरे आणि जेडीयू अध्यक्ष शरद यादव यांचीही भेट होण्याची शक्यता आहे. या भेटी दरम्यान ते यादव यांच्याशी पुन्हा एनडीएमध्ये येण्याविषयी चर्चा करणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजते. त्या‍मुळे त्यांच्या या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

एनडीएमधून बाहेर पडलेल्या जेडीयू अध्यक्ष शरद यादव यांच्याशी जर उद्धव ठाकरे यांची भेट झाली. तर एनडीएसाठी ती मोठी घडामोड असेल. ही भेट व्हावी यासाठी एनडीएच्या गोटातून प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

Leave a Comment