संजय दत्त प्रभुदेवा करणार एकत्रित काम

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यात शिक्षा झालेला अभिनेता संजय दत्तच्या निर्मिती कंपनीसाठी नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक प्रभूदेवा काम करणार आहे. या चित्रपटासंदर्भात प्रभुदेवाने काही दिवसांपूर्वीच संजय दत्तची पत्नी मान्यता यांची काही दिवसांपूर्वीच भेट घेतली. यावेळी त्यांनी आगामी काळात येत असलेल्‍या सिनेमासंदर्भत चर्चा केली असल्याचे समजते.

सध्या अभिनेता संजय दत्त तुरुंगात असला तरी त्याची पत्नी मान्यता सिनेमा निर्मितीचे सर्व काम पाहते. गेली काही वर्षे दक्षिणेत काम करणा-या प्रभुदेवाने आता हिंदीतही जम बसवला आहे. रावडी राठोडच्या यशानंतर त्याच्याचे मोठ्या प्रमाणात चित्रपट येत आहेत.

आगमी काळात प्रभुदेवा हा लवकरच त्याचा ‘रमय्या वस्तावय्या’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाकडून त्याच्या खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे या सिनेमाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आगामी काळात हीच प्रभुदेवाची जादू संजय दत्तसाठी लकी ठरते का ते पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.

Leave a Comment