अनुभवा ओमानचे निसर्ग सौंदर्य

आखाती देशातील आतापर्यंतचे अनव्रत राहिलेल्या निसर्ग सौंदर्य पाहण्याची संधी भारतीय प्रेक्षकांना हिंदी चित्रपट वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबाराद्वारे मिळणार आहे. या चित्रपटाचा बराचसा भाग ओमान आणि ओमनची राजधानी मस्कतसह विविध भागांमध्ये चित्रित करण्यात आला आहे.ओमानध्ये जास्तीत जास्त भारतीय पर्यटक यावेत यासाठी बालाजीच्या मोशन पिक्चर्स या आगामी मल्टीस्टार चित्रपटासाठी ओमान टूरिझमने विशेष भागीदारी केली आहे. बालाजी मोशन पिक्चर्स द्वारा प्रस्तुत आणि मिलन लुशिया दिग्दर्शित वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारामध्ये अक्षय कुमार, इमरान खान, सोनाक्षी सिन्हा आणि सोनाली बेंद्रे-बहल आदी कलाकारांचा समावेश असून हा चित्रपट15 ऑगस्ट 2013 पासून जगभरात प्रदर्शित होणार सोनाक्षी सिन्हाने म्हणाली, ओमानचे सौंदर्य चित्रपटात खूपच चांगल्या पद्धतीने चित्रित करण्यात आले आहे. चित्रपटाला अनुकूल असे वातावरण ओमानमध्ये आम्हाला मिळाले. ओमान खूपच सुंदर देश असून त्या ठिकाणी मी खूप चांगला वेळ व्यतित केला.

Leave a Comment