प्रियांकाने दिली मेरी कोमच्या गावाला भेट

लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती बॉक्‍सर मेरी कोम वर प्रसिद्ध चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साली एक चित्रपट बनवत आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्यांनी ब्लॅक चित्रपटाचे आर्ट डायरेक्टर उमंग कुमार यांची निवड केली आहे; तर राष्ट्रीय पारितोषिक विजेती अभिनेत्री प्रियंका चोप्रा मेरी कोमची भूमिका साकारणार आहे. यासाठी प्रियंका खूप मेहनत घेत आहे.

इतकच नाही तर ती यासाठी बॉक्सिंगचे प्रशिक्षणही घेत आहे. प्रियांकाने नुकतीच मेरीच्या इम्फाळ या गावाला भेट दिली. यावेळी स्वतः मेरी तिच्याबरोबर होती. मेरी कोमच्या कुटुंबीयांनी प्रियांकाचे प्रेमाने स्वागत केले. या भेटीचे अनुभव आणि छायाचित्रे प्रियांकाने तिच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केली आहेत. मेरी कोमवर बनत असलेल्या या चित्रपटात मेरी कोमचा मणिपूरपासून ते मुष्टियुद्धात पाच वेळा विश्वविजेती बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. पडद्यावरील महिला मुष्टियोद्धा साकारण्यासाठी प्रियांकाने कठोर परिश्रम घेत आहे. मेरी कोमचे आयुष्य जवळून जाणून घेण्यासाठी ईशान्य भारतातील मेरीच्या गावी प्रियांका आली होती. यावेळी तिने मेरीसह ईशान्य भारताची सफरही केली.

Leave a Comment