सुनिल बर्वे पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत !

लखोबा या नावाचा उल्लेख होताच क्षणार्धात आठवतो तो मराठी रंगभूमीवर स्वर्गीय प्रभाकर पणशीकरांनी जीवंत केलेला लखोबां…पण हा लखोबा तो नाही. हा लखोबा आहे, केदार शिंदेंच्या कल्पनेतील जो बुद्धिने खळ आहेच, पण त्याच्या कारवायाही त्याच्या बुद्धिला साजेशा भीतीदायक आहेत. ‘श्रीमंत दामोदरपंत’ हे केदार शिंदेच्या दिग्दर्शनाखाली रंगमंचावर आलेलं बहुरंगी विनोदी नाटक जेव्हा सिनेमाच्या रूपात पडद्यावर आणण्याचा विचार रूजला तेव्हा या लखोबाचा जन्म झाला.

मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेटी नायकांच्या यादीतील आजही आघाडीवर असलेलं नाव म्हणजे सुनील बर्वे…आजवर गोड-गोड भूमिका साकारणारा सुनील बर्वे छोट्या पडद्यावरील ‘कुंकू’ या मालिकेत काहीशा कडक भूमिकेत दिसला. पण सुनीलने अद्याप खलनायकी भूमिका कधीच साकारली नाही. त्यामुळेच केदारने जेव्हा ‘श्रीमंत दामोदरपंत’मधील खलनायकाच्या भूमिकेसाठी सुनीलची निवड केली तेव्हा बर्‍याच जणांना आश्चर्य वाटलं. कोणत्याही प्रकारचं पात्र सुनील अतिशय लीलया साकारू शकतो हा ठाम विश्वास केदार शिंदेंना असल्यानेच त्यांनी हे पाऊल उचललं. ‘श्रीमंत दामोदरपंत’ या नाटकाची कथा सिनेमाच्या रूपात मांडतना त्यात आजच्या जमान्याला अनुसरून बदल करणं अनिवार्य होतंच, पण नाटकाची कथा सिनेमाच्या भाषेत मांडतना त्यात ट्विस्ट येणंही गरजेचं होतं. त्या दृष्टिने केदार शिंदेंनी जेव्हा सिनेमाची कथा लिहायला सुरूवात केली तेव्हा त्यांच्या कल्पनेतील दोन खलनायक समोर आले. यापैकी एक होता लखोबा आणि दुसरा होता नागेश.

केदारने जेव्हा आपल्याला खलनायक साकारण्याची ऑफर दिली तेव्हा सुरूवातीला आपल्याला काहीसा धक्काच बसल्याचे सुनील म्हणतो. केदारने ज्याअर्थी विचार केला त्या अर्थी त्यामागे नक्कीच काहीतरी भन्नाट कल्पना असेल याची जाणिव होतीच. प्रत्येक कलाकार हा आव्हानात्मक भूमिकांचा भुकेला असतो. मलाही नेहमी विविधांगी भूमिका साकारायला आवडतात. मलाही नेहमी विविधांगी भूमिका साकारायला आवडतात. त्यातप्रथमच खलनायकाची भूमिका आणि तीही दुहेरी असल्याने माझ्यासाठी दुहेरी आव्हान होतं. मी हे आव्हान स्वीकारलं आणि अतिशय बारीकसारीक गोष्टींची काळजी घेत दोन भूमिकांमधील विविधता जपण्याचा प्रयत्न करत दमदार खलनायक साकारल्याचं सुनील अतिशय उत्साहित होऊन एखादं पात्र कल्पनेत येणं आणि ते प्रत्यक्षात उतरणं यात खूप अंतर असतं, पण सुनीलने ते अंतरच मिटवत आपल्या कल्पनेतील लखोबा आणि नागेश हे दोन खलनायक यशस्वीपणे साकारल्याचं दिग्दर्शक केदार शिंदे सांगतात.

Leave a Comment