कैटरीनाचे झाले आहे अल्पशिक्षण

बॉलीवूडची चिकनी चमेली कैटरीना कैफचा मंगळवारी वाढदिवस असून ती आता २९ वर्षाची झाली आहे. हॉंगकॉंग मध्ये जन्म झालेल्या कैटरीनाने २००३ साली ‘बूम’ या सिनेमातून बॉलीवुडमध्ये पर्दापण केले होते. कैटरीनाचा पाहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर पडला होता. त्यांनतर मात्र तिने एकापेक्षा एक हिट सिनेमात काम करून बॉलीवूड गाजविले आहे. आगामी काळात कैटरीनाचे ‘धूम-३’ आणि ‘बैंग बैंग’ हे सिनेमे येत आहेत.

सर्वांची आवडती असलेली कैटरीनाने शिक्षण मात्र खूपच कमी शिकले आहे. कैटरीना शिवाय बॉलीवूडमधील खूप जणंनी शिक्षण कमी घेतले आहे. काही जणांचे तर ग्रज्युएट पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले नाही. सुपरस्टार असलेल्या आमिर ख़ानने बारावीपर्यंत तर सलमान ख़ानने केवळ दहावी पर्यंत शिक्षण घेतले आहे. अभिनेत्री करिश्मा कपूरने तर पाचवीपर्यतचे शिक्षण घेतले आहे.

कैटरिनचा प्रियकर रणबीर कपूर मात्र ग्रॅज्यूट आहे. अभिनेत्री ऐश्वर्या रॉयने जयहिंद कॉलेजमध्ये आर्कीटेक्चचे शिक्षण पूर्ण केले आहे. परिणीति चोप्राने प्रोफ़ेशनल कोर्सचा डिप्लोमा पूर्ण केला आहे तर प्रियंका चोप्राने बारावी पूर्ण केली आहे. कंगना रानावतने कॉलेज सोडून मॉडलिंग स्कूलचे शिक्षण घेतले, ती दहावी पास आहे. बिपाशा बसुने बारावी पूर्ण केली आहे. तर अभिनेता अक्षय कुमारने स्कूलपर्यंत शिक्षण घेतले. अभिषेक बच्चनचे पण ग्रज्युएट अर्धवट आहे.

Leave a Comment