12 विनोदवीरांची धम्माल माझ्या नवर्‍याची बायको

मराठी चित्रपटांत आज अनेक नवनविन प्रयोग होतांना दिसातांय, कधी हे बदल कथेत तर कधी सादरीकरणांत, परंतु आता श्री. यंत्र इंटरनॅशनल प्रस्तुत, ग्लोबल मिडिया कॉर्पोरेशन निर्मित, अशोक कांबळे आणि माहन पिंपळे निर्मित मराठी चित्रपट माझ्या नवर्‍याची बायको हा एकुण 12 विनोदवीरांच्या धम्माल विनोदाने प्रेक्षकांना मंत्रमुगध करण्यासाठी सज्ज झाला आहे, अशोक कांबळे यांची कथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन कांबळे आणि सुरेंद्र वर्मा या द्वयींने केले आहे. मराठीतला आघाडीचा अभिनेता भरत जाधव आणि दिपाली सय्यद यांच्यासोबत चित्रपटांत स्मिता गोंदकर, विजय पाटकर, पंकज विष्णू, स्व.सतिश तारे, आनंदा कारेकर, पंढरीनाथ कांबळे, विजय चव्हाण, नयना आपटे, साजिद शेख, प्रदिप कबरे, हेमलता बने आणि जयवंत वाडकर या 12 कलावंतांच्या विशेष भूमिका आहेत.

पती ष पत्नी और वो, माय हसबंड वाईफ.. म्हणजे अर्थातच नवरा ष बायको मध्ये तिसर्‍या स्त्रीचा शिरकाव होणं.. परंतु या चित्रपटांत हाच ट्रॅक जरा वेगळया आणि भन्नाट विनोदाने सादर करण्यात आला आहे, चित्रपटांत भरत जाधव (हरिश्‍चंद्र खरे) तर दिपाली सय्यद (तारा) पती ष पत्नी असून त्यांच्यात येणारी ती कोण ? का येते ? कशी येते ? यासाठीच हा चित्रपट पहावा लागणार आहे. पैशांचा हव्यास.. हा एकमेव धागा वापरुन गुंफण्यात आलेली अतिशय मनोरंजक अशी कथा आणि पटकथा व त्याला तितक्याच प्रभावीपणे कलावंतांनी दिलेली साथ हेच या चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरेल. राजेश बामुघडे यांच्या गीतांना कृष्णमोहन यांनी संगीत दिले आहे.

Leave a Comment