रोमांचक लढतीत इंग्लंडचा विजय

नॉटिंगहम: रोमाचंक ठरलेल्यार अशेस कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. पाचव्या दिवशी रोमांचक ठरलेल्या या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर अवघ्या १४ धावांनी मात केली. ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅड हॅडिन आणि पॅटिनसन या अखेरच्या जोडीने विजयासाठी कडवी झुंज दिली. पण त्यांचा संघर्ष अपयशी ठरला.

पाचव्या दिवशी खेळ सुरू झाला त्यावेळी कांगारूना विजयासाठी १३७ धावाची गरज होती. त्यांचे तीन फलंदाज झटपट बाद झाले. मात्र त्यानतर हॅडिन-पॅटिनसनने दहाव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. अखेर जेम्स अँडरसनने ७१ धावांवर हॅडिनची विकेट काढत इंग्लडला कसाबसा विजय मिळवून दिला.

या मालिकेतील पहिला सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला पाचव्या दिवशी बराच संघर्ष करावा लागला. विजयासाठी ३११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, ऑस्ट्रेलियाची अवस्था पाचव्या दिवशी ९ बाद २३१ अशी झाली होती. मात्र हॅडिन आणि पॅटिनसनच्या साथीने खिंड लढवली. जेम्स अँडरसनने दुस-या डावात ७३ धावा देत पाच विकेट्स काढल्या, तर ब्रॉड आणि स्वानने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

Leave a Comment