-पुणे मुंबईत साजरी होणार बालगंधवार्ंची 125वी जयंती

पुणे, दि. 13 (प्रतिनिधी) – नटश्रेष्ठ बालगंधर्व तथा नारायण श्रीपाद राजहंस यांच्या 125व्या जयंती निमित्ताने मुंबई, पुणे, कोल्हापूर व रत्नागिरी येथे बालगंधर्वाचा प्रत्यक्ष सहवास व त्यांच्या नाट्यकलेचा अनुभव घेतलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय या व्यक्तींनी सांगितलेल्या बालगंधर्वांच्या आठवणींवर ’साक्षात गंधर्व’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात येत्या 15 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता बालगंधर्व नाट्य मंदिर येथे ’साक्षात गंधर्व’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ’बालगंधर्व’ यांचे साथी पंडित पुरुषोत्तम वालावलकर यांनी सांगितलेल्या आठवणींची चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. यात प्रकाशचंद्र गोखले व सत्कारमूर्ती अशोक काळे यांच्यासह मान्यवरांचा सहभाग असेल. या कार्यक्रमानंतर ’9 नाट्यगंधा’ निर्मित आनंद देणारे प्रसन्न नाटक ’संगीत सौभद्र’ या नाटकांचा प्रयोग दाखविण्यात येणार आहे.

Leave a Comment