ऐश्वर्या करणार लवकरच एन्ट्री

बॉलीवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या रॉय लवकरच पुनगरागमन करणार अशी चर्चा गेल्या वर्षभरापासून ऐकावयास मिळत आहे. मात्र अजून तरी तिने कुठलाच सिनेमा साईन केला नसल्याचे समजते. मात्र गेल्‍या काही दिवसांतील तिची हालचाल पाहता लवकरच ती एका चांगल्या‍ भूमिकेत कमबॅक करण्याच्या मूडमध्ये आहे.

सध्या ती काही कार्यक्रमाच्या माध्यामातून पुन्हा एकदा अक्टिव झाली आहे. गेल्या काही दिवसांत तिने तीन-चार मोठया फिल्ममेकर्स सोबत चर्चा केली आहे. त्यांच्या सिनेमाची ऐशने यावेळी स्क्रिप्ट्स सुध्दा ऐकली आहे. यापैकी काही भूमिका तिला पसंद सुध्दा पडली आहे. मात्र अजून तिने काहीही फायनल केलेले नाही.

ऐशची नुकतीच दिगदर्शक संजय लीला भंसाळी आणि करण जौहर या दोघांनी भेट घेतली आहे. दोघेजन पण तिला अप्रोच झाले असल्‍याचे समजते. तसे पाहिले तर ऐशला एक पर्फेक्ट कमबॅक करायचे आहे. त्यामुळे ती रोल निवडण्यासाठी जादा वेळ घेत आहे. ऐश्वर्याने २००० साली संजय लीला भंसाळीच्या ‘गुजारिश’ या सिनेमातून सुरूवात केली होती. २०११ साली आई झाल्यानंतर तिने ब्रेक घेतला आहे.

Leave a Comment