करीना फिरतेय महागडया कारमधून

विवाह झाल्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरला कमी काम मिळेल असे सर्वांना वाटत होते. मात्र विवाहाचा काहीच परिणाम तिच्या कामावर झाला नसून तिला पूर्वीप्रमाणेच सिनेमातून आणि जाहीरातीतून मागणी आहे. गेल्या काही दिवसापासून तर तिची जाहीरातीची संख्या वाढली असून त्यामुळे अनेक कंपनीची ब्रांड अबेस्डर असलेल्या करीनाच्या‍ उत्पनन्नात दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून करीना लेक्सस एलएस ४७० आणि एसयूवीसारख्या महागडया कारमधून फिरताना दिसत आहे.

करीनाने काही दिवसांपूर्वी सैफ सोबत विवाह केला आहे. त्यानंतर बॉलीवूडमध्ये तिचा रूबाब वाढला आहे. सध्या करीना एका सिनेमासाठी साडे पाच कोटी रूपये मानधन घेत असल्याचे समजते. बॉलीवूडमधील अभिनेत्रीत तीच सर्वाधिक मानधन घेते. त्याशिवाय करीना सध्याच ब-याच कंपन्याची ब्रांड अंबेस्डर आहे. त्यामध्ये सोनी वायो, लैक्मे, सोनी एरिक्सन, फिलिप्स, क्लीनिक ऑल क्लियर, एक्सपीरिया, लक्स आणि लिम्का या कंपन्याचा समावेश आहे.

या सर्व कंपन्‍याच्या, जाहीरातीतून बेबोला महिन्याला कोटयवधी रूपये मिळतात. सध्या तिच्या जीरो फिगरची पण बॉलीवूडमध्ये खूप चर्चा आहे. करीनाने आतापर्यंत इंडस्ट्रीमधील तिन्ही खान सोबत काम केले आहे. त्या‍मुळेच गेल्या काही दिवसांपासून करीना लेक्सस एलएस ४७० आणि एसयूवीसारख्या कारमधून फिरताना दिसत आहे.

Leave a Comment