
संजय दत्तची प्रमुख भूमिका असलेला पोलिसगिरी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. नुकतंच या सिनेमाचे स्क्रीनिंगही पार पडले..यावेळी संजूबाबाला सा-यानीच मिस केले. संजूबाबा जेलमध्ये भरती झाल्यानंतर बिग स्क्रीनवर झळकलेला त्याचा पहिला सिनेमा ठरला तो पोलिसगिरी. जरी या सिनेमात पोलिसाच्या प्रमुख भूमिकेत संजूबाबा असला तरी सध्या तो जेलमध्ये कैद्याची भूमिका अगदी चोख पणे बजावतोय.
