कैटरीना उतरणार आता निमिर्ती क्षेत्रात

बॉलीवुड अभिनेत्री कैटरीना कैफ आता सिनेमात एक्टिंग करत करत त्यासोबतच सिनेनिर्मितचे काम करणार असल्याचे समजते. सध्या कैटरीना कैफ आमिर खान सोबत ‘धूम-३’ तर ऋतिक रौशन सोबत ‘बैग-बैग’ या सिनेमात काम करीत आहे. या सिनेमात काम करत असतानाच आता अभिनेत्री कैटरीना कैफ सिनेमा निर्माता करण्याचा विचार करीत आहे.

त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून कैटरीना सध्या चांगली स्क्रिप्ट असलेल्या सिनेमाची मागणी करीत आहे. आतापर्यंत बॉलीवुडचे फिल्मकार कैटरीना कैफला शो पीस समजून भूमिका देत होते. या तिच्या प्रतिमेतून आता ती बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत आहे. कैटरीना आता येणा-या सिनेमात महिला प्रधान भूमिका करण्याचा विचार करीत असल्याचे समजते. मात्र तशी भूमिका तिला मिळत नसल्याने स्वताच्या सिनेमातून अशा स्वरूपाची भूमिका करण्याचा विचार ती करत आहे.

सध्या कैटरीना ‘धूम-३’ व ‘बैग-बैग’ या सिनेमात काम करीत आहे. या सिनेमाच्या शुटिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर तिच्याकडे कोणताच सिनेमा नाही. त्यामुळे या काळात कैटरीना एखाद़या सिनेमा निर्माता करण्याचा विचार करीत आहे. यामध्ये ती यशस्वी ठरणार की नाही हे पाहण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

Leave a Comment