श्रद्धा थिरकणार आयटम साँगवर

गेल्या काही दिवसांपासून सर्वच सिनेमातून आयटम साँग पहावयास मिळत आहे. सध्या या आलेल्‍या आयटम साँगच्या फॅडला पण प्रेक्षक स्वीकारत असल्याने प्रत्येक सिनेमात आता आयटम साँग आवश्यक झाले आहे. त्यानिमित्ताने अभिनेत्रींचा भाव मात्र चांगलाच वधारलेला दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘आशिकी-२’ चित्रपटाने प्रसिद्धीस आलेली श्रद्धा कपूर आता आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे. आगामी काळात येत असलेल्या करण जोहरच्या ‘उंगली’ या सिनेमात ती आयटम साँग करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिच्या सोबत या सिनेमात मुख्य नायिकाची भूमिका करीत असलेला इमरानही या गाण्यात तिच्या सोबत थिरकणार आहे.
लवकरच येत असलेल्या ‘उंगली’ या सिनेमाचे दिग्दर्शन रेन्सील डीसिल्वा करत आहे. या सिनेमात संजय दत्त, नेहा धुपिया, इमरान हाश्मी, रणदीप हुड्डा, कंगना रानावत मुख्य भूमिका आहेत. त्या सोबतच आगामी काळात श्रद़धा कपूरचे दोन सिनेमे येत आहेत. ती दिग़दर्शक करण जोहरच्या ‘गोरी तेरे प्यार मै’ सिनेमात करीना आणि इमरान खानसोबत काम करणार आहे. तर मोहित सुरी दिग्दर्शित ‘द विलन’ सिनेमात श्रद्धा सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे.

Leave a Comment