सोळावं वरीस धोक्याच सांगतेय ब्राझीलची इजाबेल

सिक्सटीन’ सोलाव’ वरीस धोक्याच’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राज पुरोहित यांनी केले आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला 12 जुलै ला येत आहे. चित्रपट भारतातील मुलांची बदलती मानसिकता चित्रित करतो. या चित्रपटात इंटरनेट, पेज़-3, आणि 300 पेक्षा अधिक टि.व्हि. चॅनल्सच्या जगात भारतातील किशोरवयीन मुलांच्या नष्ट होत चाललेल्या निरागसतेवर मार्मिक भाष्य केले आहे. या चित्रपटात त्यांच्या आयुष्यातील चांगल्या वाईट घडामोडींचे चित्रण सोळा भागात केले आहे.

हा चित्रपट सोळा वर्ष वयोगटातील मुले व त्यांचे पालक यांच्यासाठी बदल सुचवणारा चित्रपट आहे, कधी प्रेमाने तर कधी क्रूरतेने. या चित्रपटातुन ब्राझिलची मॉडेल, अभिनेत्री इजाबेल लिथ बॉलिवुड मध्ये पदार्पण करतेय. तिने अनूची भूमिका साकारली आहे, जी तरुण बुध्दीमान, संवेदनशील, बोल्ड आणि सुंदर व्यक्तिमत्त्व असलेली आहे. तिच्या सभोवतालच्या पुरुषांवर तिचा प्रभाव व त्याचा फायदा कसा घ्यायचा याविषयी ती सतर्क असते. तिला मिस इंडिया होण्याची महत्वकांक्षा आहे आणि गॅल्मरच्या जगावर राज्य करण्याची तिची इच्छा आहे.

दुसरे महत्वाचे पात्र म्हणजे वामिक गब्बी (तनिषा) जी नेहमी प्रेमाच्या शोधात असलेली बिनधास्त स्वभावाची मुलगी आहे. कोणत्याही व्यक्तीबरोबर आंधळेपणाने डेट वर जाण्यास तिला काहीच प्रॅाब्लेम नाही पण त्याच मुलासोबत परत जाण्यास मात्र तिला कमीपणा वाटतो स्वप्नाळू स्वभावाची गोड मुलगी म्हणजे मेहेक मनवानी (निधी) जी खरोखरच आदर्श मुलगी आहे. जिच्यामुळे तुम्हाला सोळाव्या वर्षात जावे वाटेल. अश्‍विन (हायपिल मॅथ्युज) नावाचे एक आत्मकेंद्रीत पात्र देखील या चित्रपटात आहे. अतिशय कमी आत्मविश्‍वास असलेला हा मुलगा तनिषाचा क्लासमेंट आहे व तिच्यावर प्रेम देखील करतो. त्याचे वडिल अतिशय संतापी आहेत. त्यांना त्याने आय.पी.एस व्हावे ही इच्छा आहे. ‘सिक्सटीन’ येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment