असिनने केली सोनक्षीची सुट़टी

बॉलीवुडची अभिनेत्री असिन येत्या काळात आता ‘माचोमैन’ जॉन अब्राहम सोबत ‘वेलकम-२ या सिनेमातून रोमान्स करताना दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हिट सिनेमे दिल्यायने सध्या ती भलतीच फार्मात आहे. यापूर्वी ‘वेलकम-२ या सिनेमासाठी दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाला साईन करण्यात आले होते. मात्र आता तिच्या जागी असिनला संधी देण्यात आली आहे.

गेल्यात काही दिवसांपासून बॉलीवुडमध्ये चर्चा आहे की, दिग़दर्शक अनीस बज्मीच्या ‘वेलकम-२ या सिनेमासाठी जॉन अब्राहमच्या अपोजिट असिनची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी या सिनेमासाठी सोनाक्षी सिन्हाची निवड करण्यात आली होती. मात्र डेटस प्रॉब्लममुळे सोनाक्षीने हा सिनेमा करण्यास नकार दर्शविला होता.

२००७ साली प्रर्दशित झालेल्या सुपरहिट ‘वेलकम’ या सिनेमाचा ‘वेलकम-२’ हा सिनेमा सीक्वल आहे. ‘वेलकम’ मध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका कैटरीना कैफने केली होती. आता तिच भूमीका असिन करणार आहे. यापूर्वी ‘वेलकम’ मध्ये अक्षय कुमार, कैटरीना कैफ, नाना पाटेकर, अनिल कपूर, फीरोज खान, मल्लिका शेरावत आणि परेश रावल यांची मुख्य भूमिका होती. ‘वेलकम-२’ मध्ये अक्षय कुमारची भूमिका जॉन अब्राहम करनार आहे.