राममंदिराचे काम लवकरच सुरू करणार- शाह

आयोध्या- भारतीय जनता पार्टीचे महामंत्री आणि उत्तरप्रदेशचे प्रभारी अमित शाह यांनी शनिवारी आयोध्येला भेट दिली. यावेळी त्यांनी येथील सुशासनसोबतच याठिकाणी लवकरच राम मंदिर निर्मितीचे काम हेच भाजपची प्राथमिकता असल्याचे पत्रकारांशी बोलताना अमित शाह यांनी स्पष्ट‍ केले.

वादग्रस्त ठिकाणी असलेल्या राम जन्मभूमीमधील प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या रामललाचे दर्शन शाह यांनी शनिवारी घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना शहा म्हणाले, ‘भाजपने राम मंदिर निर्मितीच्या कामाला आतापर्यंत प्राधान्य दिले आहे. मी रामललाकडे पण यावेळी मंदिर निमिर्तीचे काम हाती घेतले जावे व हे काम लवकरच पुर्ण व्हावे अशी प्रार्थना केली आहे.’

यावेळी अमित शाह सोबत काही स्थानिक कार्यकर्ते देखील दर्शनासाठी आले होते. रामललाच्या दर्शनानंतर त्यांनी येथील प्रसिद्ध असलेल्या हनुमान गढ़ीचे दर्शन घेतले. शाहने रामललाचे दर्शन घेवून भाजपने अजून तरी हिंदूत्वाचा अजेंडा सोडला नसल्याचे सर्वांना दाखविण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment