प्रेमासाठी थोडापण वेळ नाही-परिणीती चोप्रा

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचे नाव उदय चोप्रा, जॅकी भगनानी, दिग्दर्शक मनीष शर्मा आणि अर्जुन कपूर यांच्याशी जोडले जात आहे. मात्र या सर्व गोष्टीसाठी तिच्याकडे थोडापण वेळ नसल्याचे खुद़द परिणीती चोप्रा हिने सांगून सर्वानाच बुचकाळयात टाकले आहे.

सध्या, परिणीती चोप्रा शुटच्या बिजी शेडयूलमुळे खूपच व्यस्त आहे. या कामातूनच सध्या तिला वेळ मिळत नाही. तर तिला वास्तविक जीवनात प्रेमासाठी वेळच मिळत नसल्याचे तिने स्पाष्ट केले आहे. परिणीती सध्या ‘हॅंसी तो फसी’, ‘किल दिल’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटांच्या शुटमध्ये बिजी आहे. आगामी काळात याव्यतिरीक्त तिचा ‘इशकजादे’ हा दिग्दर्शक फैसल यांच्या सोबतचा चित्रपट येत आहे.

याबाबत अधिक बोलताना परिणीती म्हणाली, ‘मी कसल्याच अफवांवर चिंता करीत नाही. त्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. मी बॅंकॉकमध्ये शूटिंग करत आहे आणि ती पूर्ण झाल्यावर लगेचच दुस-या चित्रपटाच्या शूटिंग करता मुंबईला रवाना होणार आहे. कोणाशी संबंध तर सोडूनच द्या पण मला जेवयालाही वेळ नाही. सध्या मी माझया कामावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे मी इतर गोष्टीकडे लक्ष देत नाही.’

Leave a Comment