महायुतीची सत्ता आल्यास उपमुख्यमंत्रीपद पहिजे- आठवले

सांगली: बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी अशी एक म्हण मराठीत प्रचलित आहे. त्या प्रमाणे आता निवडणुका जवळआल्यानंतर महायुतीतील नेत्यांना आतापासूनच सत्तेची स्वप्ने पडू लागली आहेत. सांगली येथील प्रचारसभेत आरपीआय नेते रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री बनण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यांच्या या मागणीमुळे आता येत्या काळात शिवसेना-भाजप महायुतीत यामुळे नवीन वादाला तोंड फुटनार आहे.

सांगली महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आठवले सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी भरसभेत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासमक्षच आपली मागणी केली. आगामी काळात जर राज्यात महायुतीची सत्ता आलीतर मुख्यमंत्री कुणीही होवो, पण उपमुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळाले पाहीजे, अशी मागणी आठवलेंनी केली आहे.

या सभेत गोपीनाथ मुंडे यांनी आघाडी सरकारमधील अनेक मंत्री यांना चिमटे काढले. त्यानंतर रामदास आठवले यांच्याड शेरो-शायरीने सभेला आलेल्या सर्वजणांची चांगली करमणूक झाली. त्याचप्रमाणे या प्रचारसभेत राजू शेट्टी आणि किरीट सोमय्या यांच्या टोलेबाजीमुळे सभा चांगली गाजली. या सभेला नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment