सोनाक्षी चालली सुट़टीला

एकानंतर एक हिट सिनेमे देणारी बॉलीवुड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची काही दिवसांतच एक मोठा सिनेमा रिलीज होत आहे. काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी आणि अभिनेता रणबीर सिंह यांच्या ‘लूटेरा’ या सिनेमाची स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्या्त आली होती. यावेळी सोनाक्षीची मम्मी पूनम सिन्हा सुध्दाल उपस्थित होती. या सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी तिला काही सुचक कमेंट्स ऐकण्यास मिळाल्याने सोनाक्षी खूपच खुश होती.

सगळेजण ‘लूटेरा’ हा सिनेमा रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत असतनाच सोनाक्षी मात्र तिकडे कामांपासून ब्रेक घेण्याची तयारी करीत आहे. सोनाक्षीच्या जवळील सुत्राने दिलेल्या माहितीनुसार येत्या काळात काही दिवस सोनाक्षी सुट़टी घेण्याचा विचार करीत आहे. यावेळी सोनाक्षी सोबत काही जवळचे मित्र असणार आहेत. सोनाक्षी सुट़टीला कुठे जाणार आहे याबाबत मात्र गुप्तता पाळण्यात येत आहे.

सुट़टीहून आल्यानंतर पुन्हा सोनाक्षी कामाला प्राधन्य देणार आहे. सध्या आगामी काळात येणार असणार असलेल्या ‘वन्स अपोन ए टाइम इन मुंबई दोबारा’ या सिनेमाचे प्रमोशन आल्यानंतर तिला करायचे आहे. त्या मुळे पुन्हा ती कामात बिजी होणार आहे. यामुळे तिला काही काळ का होईना सुट़टीची आवश्यकता आहे.

Leave a Comment