आता रणबीर होणार सुपरहिरो

येत्या काळात बॉलीवूडला आता आखखीन एक सुपरहिरो भेटणार आहे. आगामी काळात बॉलीवूडचा हॉट अभिनेता रणबीर कपूर आता सुपरहीरो होणार आहे्. दिग़दर्शक अयान मुखर्जीच्या आगामी काळात येत असलेल्याब सिनेमात तो सुपरहिरोची भूमिका करणार आहे. यापूर्वी अभिनेता रितिक रोशन ‘कृष’ आणि शाहरुख खान ‘रा. वन’ या सिनेमत सुपरपावरची कमाल केली होती.

काही दिवसांपूर्वी रणबीरचा ‘ये जवानी है दीवानी’ या सिनेमानंतर आगामी काळात कोणता सिनेमा येणार याबाबत त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली होती. आगामी काळात येत असलेला हा सिनेमा रणबीर कपूर साठी चैलेंजिंग आहे. त्यामुळे या सिनेमातील रणबीर कपूरची भूमिका थोडीसी असणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून अयान हॉलिडेसाठी विदेशात गेला आहे. त्या‍ठिकाणहून परतल्यानतर या सिनेमाचे काम तो हाती घेणार आहे. अयान फ्रेश मूडमध्ये या नवीन स्क्रिप्टबाबत विचार करणार आहे. रणबीर सध्या कैटसोबत हॉलिडेसाठी जाण्याचा प्लान करीत आहे. त्यामुळे दोघेजण सुट़टीवरून परतल्‍यानंतरच या सिनेमाच्या कामाला गती येणार आहे. रणबीरने यापूर्वी अयान सोबत काम केले आहे. सूत्रोंने दिलेल्या महितीनुसार रणबीरसाठी अयान हा एक मोठया बजेटचा सिनेमा करीत आहे.

Leave a Comment