राज्यात जोरदार पावसाची शक्यता

पुणे – दक्षिण गुजरात किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीदरम्यानचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे गेलया दोन दिवसांपासून तीव्रता वाढली आहे. कोकण, गोवा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्यप्रदेश आणि लगतच्या परिसरावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रताही वाढल्याने विदर्भा अणि मराठवाडयात बुधवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. येत्याब चार दिवसात पावसाचा जोर कायम राहून राज्यात सर्वदूर पाऊस होईल ,’ असे हवामान खात्याच्या उपमहासंचालक डॉ . मेधा खोले यांनी सांगितले.

गेले आठ दिवस उघडीप दिल्यानंतर राज्यात सवेत्र बुधवारी पावसाने हजेरी लावली. सकाळ पासूनच अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या. राज्यात कोकण व मराठवाड्यातील काही ठिकाणच्या मुसळधार पावसासह सर्वत्र जोरदार पावसाची नोंद झाली . पुढील चार दिवस राज्यातील पावसाचा जोर कायम राहील पुण्यात येत्या ४८ तासांत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.

बुधवारी रात्री साडेआठपर्यंतच्या २४ तासांत मुरूड येथे २४० मिमी, तर मध्य महाराष्ट्रात गगनबावडा येथे २३० मिमी पावसाची नोंद झाली . बुधवारी राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद महाबळेश्वर येथे १०३ मिमी इतकी झाली. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघदीप दिल्याने शेतक-यांत चिंतेचे वातावरण होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या सर्वदूर पावसाने शेतक-यांची चिंता काही अंशी मिटली आहे.