यंदाची जगन्नाथ रथयात्रा पुष्य योगावर

भुवनेश्वर दि.४ – यंदा जगन्नाथपुरीत १० जुलैला सुरू होत असलेली भगवान जगन्नाथाची रथयात्रा विशेष पुण्यदायी आहे. कारण १० वर्षांच्या कालावधीनंतर ही यात्रा पुष्य नक्षत्रयोगावर होत आहे. त्यामुळे भाविकांसांठी ही फार मोठी पर्वणीच ठरणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार २७ नक्षत्रांत पुष्य नक्षत्राला विशेष महत्त्व दिले जाते. सोने खरेदी, वाहन खरेदी यासारख्या बाबींसाठीही पुष्य नक्षत्र उत्तम मानले जाते. यंदा ९ जुलैला सकाळी १० वाजता पुष्य नक्षत्र लागत असून १० जुलैला ते दिवसभर आहे. या मुहूर्तावर भगवान जगन्नाथाची केलेली पूजा अर्चा लाभदायक ठरते असे ज्योतिषांचे म्हणणे आहे. हा योग अत्यंत पवित्र योगातील एक असून त्याचा प्रभावही चांगला आहे. परिणामी या योगावर भगवान जगन्नाथ रथयात्रेतून मिळणारे पुण्यही हजार पटींनी अधिक आहे असे ज्योतिषी अजय शास्त्री यांनी सांगितले.