सलमान करणार जैकलीनसोबत काम

जुलै महिन्याच्या शेवटी अभिनेत्री जैकलीन फर्नाडीज अभिनेता सलमान खान सोबत ‘किक’ या सिनेमाची शूटिंग सुरू करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जैकलीन सिनेमाच्या शूटिंगसाठी खूपच उत्साहित आहे. जैकलीनच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जैकलीन ‘किक’ या सिनेमाची शूटिंग महिन्याच्या शेवटपासून सुरू करणार आहे. त्याची सर्व तयारी तिने पूर्ण केली आहे.

‘किक’ या सिनेमाच्या पहिल्या भागाचे शूट ब्रिटनमध्ये शुट केले जाणार आहेत. जैकलीन म्हणाली, ‘मी या सिनेमासाठी तयारी पुर्ण केली आहे. आगामी काळात या सिनेमाच्या शुटिंगसाठी आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. मी या सिनेमात सलमान खान सोबत काम करणार असल्याने खुप उत्साहित आहे.’

२००९ साली आलेल्या सुपरहिट तेलुगू सिनेमाचा ‘किक’ हा हिंदी रिमेक आहे. ‘किक’ हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे. या सिनेमात अभिनेता सलमान खान आणि जॅकलीन प्रमुख भूमिका करीत आहेत. ‘किक’ या सिनेमाचे दिग़दर्शन साजिद नाडियाडवाला करणार आहेत.

Leave a Comment