इम्रान हाश्मी घेणार आमीर खानची जागा

बॉलीवूडचा सिरीयल किसर अशी ओळख असणारा इम्रान हाश्मी आता मि. परफेक्शनीस्ट आमीर खानची जागा घेणार आहे. आमीर खानचा ” दिल है की मानता नही” या चित्रपटाचा रिमेक येतोय. यात इम्रान अमीरची भूमिका साकारणार आहे. आता तो या भूमिकेला कितपत न्याय देतोय हे लवकरच कळेल. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या आमीरच्या ” दिल है की मानता नही ” या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलीच धूम केली होती. गुलशन कुमार यांनी प्रोड्यूस केलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट यांनी केले होते. आता या चित्रपटाचा रिमेक येतोय. याच दिग्दर्शन कोण करणार हे अद्याप समजू शकलेले नाही. आधी अमीर खानच्या भूमिकेसाठी त्याचा भाचा इम्रान खान याचे नाव चर्चेत होते. मात्र आता हा चित्रपट इम्रान हाश्मीच करणार आहे.

Leave a Comment