प्रेम नको, पैसा हवाय नर्गिसला

– रॉकस्टारफेम अभिनेत्री नर्गिस फाखरी आणि उदय चोप्रा यांचे प्रेमप्रकरण सध्या भलेही बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय बनले असले तरी नर्गिस मात्र आपली कारकीर्द धोक्यात टाकून असे कोणतेच नाते बनविण्यास इच्छुक नाही. नर्गिस बॉलीवूडमध्ये प्रेम करण्यासाठी नाही तर पैसा कमविण्यासाठी आली आहे. खुद्द
तिनेच हा खुलासा केला आहे. रॉकस्टार चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी नर्गिसच्या प्रेमप्रकरणांबाबत बरेच बोलले जात होते. उदय चोप्रासोबत असलेल्या तिच्या कथित संबंधाची अफवाही तेव्हाच उठली होती. नर्गिस सांगते की, उदयशी माझी ओळख आहे आणि आमच्यात अतिशय चांगली मैत्रीही आहे, पण त्याला प्रेमाचे नाव देणे योग्य ठरणार नाही. माझे अनेक मित्र आहेत, पण ही निखळ मैत्री आहे. त्यांच्याशी संबंध बनविण्याची मला अजिबातही गरज वाटत नाही. कारण मी इथे प्रेम नव्हे तर पैसे कमविण्यासाठी आले आहे.

रॉकस्टारनंतर बरेच दिवस रिकामीच बसून असलेल्या नर्गिसला सध्या बर्‍यापैकी काम मिळत आहे. मद्रास कॅफे आणि शौकिन या चित्रपटांच्या रिमेकमध्ये ती काम
करत आहे. दुसरीकडे राजकुमार संतोषी यांच्या फटा पोस्टर निकला हिरो या चित्रपटातील आपल्या आयटम साँगकडूनही तिला मोठय़ा अपेक्षा आहेत. अशा
प्रकारचे एखादे आयटम सॉँग करण्याची माझी बर्‍याच दिवसांची इच्छा होती. मी जेव्हा ७0 वर्षांची होईल, तेव्हा माझ्या नातवंडांना हे आयटम सॉँग दाखवून ही नाचणारी तरुणी तुमची आजी आहे, असे सांगण्याची माझी इच्छा असल्याचे ती म्हणते. नर्गिसने आजी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, म्हणजे तिला लग्नही करावे लागेल, पण ते कुणाशी हे अजून तिने नक्की केलेले नाही. लग्नासारख्या संस्थेवर अजिबातही विश्‍वास न ठेवणारी नर्गिस संपूर्ण आयुष्य एकाच व्यक्तीसोबत घालविण्याचा विचारही आपण करू शकत नसल्याचे सांगते. त्यामुळे नर्गिस कुणावर प्रेम करते आणि ती लग्न कधी करणार याबाबत तीच सांगू शकते.

Leave a Comment