दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक

पुणे, दि. 1 (प्रतिनिधी) – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फ त सन 2014 मध्ये घेण्यात येणार्‍या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची 20 फे ब्रुवारी, तर दहावीची 3 मार्च रोजी परीक्षेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी दिली. बारावीची लेखी परीक्षा दि. 20 फेब्रुवारी ते 29 मार्च 2014 या कालावधीत होणार असून, भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांच्या लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी तीन दिवसांचा खंड ठेवण्यात आला आहे. दहावीची लेखी परीक्षा 3 मार्च ते 27 मार्च या कालावधीत होणार आहे. दहावीच्या मुख्य विषयांच्या पेपरमध्ये किमान एक दिवसाचा खंड ठेवण्यात आला आहे.

परीक्षांचे वेळापत्रक तयार करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी राहू नये, याचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे संभाव्य वेळापत्रकात काही बदल होण्याची श्‍नयता कमी आहे. मात्र, या वेळापत्रकात काही सूचना, हरकती असतील, त्याचा निश्‍चित विचार केला जाईल. त्यासाठी विभागीय मंडळाकडे येत्या 15 दिवसांत हरकती अथवा सूचना पाठवाव्यात, अशी माहिती जाधव यांनी दिली.

Leave a Comment