रक्ताच्या एका थेंबातून तयार केला उंदीर

टोकियो दि.२८ – जपानमधील संशोधकांनी रक्ताच्या एका थेंबातून उंदराचा क्लोन बनविण्यात यश मिळविले आहे. रायकेन सेंटर फॉर डेव्हलपमेंट बायोलॉजी संस्थेतील संशोधकांनी ही किमया साध्य केली आहे.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार एका उंदराच्या शेपटीतून रक्ताचा एक थेंब काढून घेण्यात आला आणि विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून त्यापासून हा क्लोन तयार करण्यात आला. हा क्लोन म्हणजे उंदरीण आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार पहिल्या पिढीच्या रक्तापासून क्लोन बनविण्यातील यशाचे प्रमाण साधारण १० टक्के इतके असते तर नवीन पिढीत हेच प्रमाण १४ टक्के इतके असते. सोमॅटिक पेशींपासून हा क्लोन बनविला गेला असून या पेशींची जिवंत क्लोन बनविण्याची क्षमता अन्य पेशींपेक्षा अधिक असते.